मुंबई – येथील हॉटेल ललित येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते ग्लोबल बिझनेस अवार्डने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट बहुशाखीय शिक्षण संस्था म्हणून ‘सूर्यदत्त’ला गौरविण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्यासह ‘सूर्यदत्त’ परिवारातील रेणुका घोसपुरकर, पूजा विश्वकर्मा, अभिश्री मोर यांनी शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. रेणुका घोसपुरकर व पूजा विश्वकर्मा यांनी शिल्पा शेट्टीचा चित्रपट प्रवास दर्शविणारे एक स्क्रॅप बुक सादर केले. हे स्क्रॅप बुक सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये (एसआयएफटी) फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘ग्लोबल बिझनेस अवार्ड्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शिक्षणापासून आरामदायी जीवनशैली अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातील चांगले कार्य कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची निवड करून त्यांना सन्मानित केले जाते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त शिक्षण संस्था ही विविध शाखांचे शिक्षण देणारा एक गुलदस्ता आहे. येथे शालेय, विद्यालयीन, महाविद्यालयीन, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी असे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमर्स, ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, इनेटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, अनिमेशन, विधी, सायबर सुरक्षा, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, फिल्म मेकिंग, ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ अँड फिटनेस, परफॉर्मिंग आर्टस् आदी अभ्यासक्रम येथे शिकवले जातात. ‘एनरीचिंग करिअर्स अँड एनहानसिंग लाईव्ह’ ही टॅगलाईन घेऊन सूर्यदत्तमध्ये अविरतपणे जागतिक दर्जाचे, सर्वांगीण विकासाचे शिक्षण देऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान देतील, अशा युवकांना तयार करत आहोत.”