कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप, सणसवाडी ते वढू बुद्रुक, फेबर कंपनी, एल अँड टी फाटा ते तळेगाव ढमढेरे, कासरी ते धायारकर वस्ती ते तळेगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना आमदार अशोक पवार यांनी केल्याने तातडीने कामाला सुरुवात केली आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सूचना आमदार पवार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. यावेळी आमदार पवार यांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करीत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचा सूचना केल्या. यावर कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप, सणसवाडी ते वढू बुद्रुक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पिंपळे जगताप व तळेगाव ढमढेरे येथे शेतकऱ्यांना शेतीमाल नेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आमदार पवार यांच्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आमदार पवार यांचे आभार मानले.