मुंबई – कमाल रशीद खान म्हणजेच केआरके अनेकदा कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत असतो. यावेळी त्याने ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानवर निशाणा साधला आहे.केआरकेने ट्विट करत सारा अली खानला कोणीही चित्रपट देण्यासाठी तयार नसल्याचा दावा केला आहे.
केआरके स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणत असला तरी तो अनेकदा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर टीका करताना दिसतो.मग कधी तो अमीर खानची टिंगल करतो तर कधी सलमान खानबाबत आक्षेपार्ह विधान करतो. आता तर त्याने थेट सारा अली खानबाबत ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये केआरके म्हणतो,”वाईट वेळ तर केव्हाही येऊ शकते. जशी सारा अली खानची आली आहे. आज बिचारीला कोणी चित्रपट देण्यासाठी तयार नसल्यामुळे बिचारी शेहनाज गिलच्या शोमध्ये गेली आहे. एवढच काय पण समीक्षक देखील झाली आहे आणि चित्रपटाचे प्रमोशन देखील करत आहे. तरस येत आहे बिचारीवर” अशा आशयाचे ट्विट केआरकेने केला आहे. यावेळी त्याने युट्युबर आशिष चंचलानी याचा असभ्य भाषेत उल्लेख केला आहे.
देखो बुरा वक़्त तो कभी भी आ सकता है, जैसे सारा अली ख़ान का आया है! आज बेचारी को कोई film देने को तैयार नहीं है! तो बेचारी #ShehnaazGiII के थके हुऐ show में गई! यहाँ तक कि Critic भी बन गई है! अब गेंडे @ashchanchlani के साथ फ़िल्मों का promotion भी कर रही है! तरस आता है बेचारी पर!
— KRK (@kamaalrkhan) April 29, 2023
‘मेट्रो इन दिनो ‘मध्ये दिसणार सारा
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत ‘मेट्रो इन डिनो’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय अभिनेत्री ‘ये वतन मेरे वतन’चाही भाग असणार आहे.