मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे फॅशन सेन्स कमालीचे आहेत. पार्टीला जाण्यापासून ते सकाळच्या जिमला जाण्यापर्यंत अभिनेत्री अनेक स्टायलिश कपडे घालतात. नेटकरी देखील वारंवार अभिनेत्रींच्या स्टायलिश सेन्सची दाद देताना दिसतात. सध्या नेटकऱ्यानी मलायका अरोरा आणि सारा अली खान यांच्यात तुलना करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.
मलायका अरोराच्या जिम आऊटफिट्सचे अनेक चाहते आहेत. तिच्या कॅप पासून ते हातात घातलेले बँड कोणत्या ब्रँडचे आहे हे देखील चाहत्यांना माहित असते. सध्या सारा अली खानचे देखील जिम लूकमधील फोटो व्हायरल होताना दिसताहेत. या फोटोमध्ये सारा रेड शॉर्ट्स आणि ब्लॅक टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यासोबतच साराने मॅचिंग अशी रेड कॅप देखील घातल्याचे पाहायला मिळते.
आत्तापर्यंत मलायका स्टाईलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती पण यावेळी तिला बी-टाउनच्या सौंदर्यवतींकडून टक्कर मिळत आहे. मग ती सारा अली खान असो, जान्हवी कपूर असो किंवा इतर बॉलीवूड स्टार असो. असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळी नेटकऱ्यानी साराला मलायकाची स्पर्धक असल्याचे म्हंटले आहे. अनेकांनी तर सारा अलीच्या फोटोंवर ‘मलायका फिकी आहे’ असे म्हंटले आहे.