मुंबई – सारा अली खान आणि विकी कौशल यांचा आगामी सिनेमा ‘जरा हटके जरा बचके’ चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे. यादरम्यान दोघांनीही ट्रेलर लॉंचसाठी अनोख्या हटके स्टाईलने एंट्री केल्याचे पाहायला मिळाले.
बॉलीवूड स्टार्स अनेकदा त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी अनोखे मार्ग शोधतात. काही फक्त सोशल मीडियावरच माहिती देतात, तर काही आपले रूप बदलून लोकांमध्ये बसतात. सारा अली खान आणि विकी कौशल यांनीही जास्तीत जास्त लक्ष वेधून घेण्यासाठी एक साधा आणि डाउन-टू-अर्थ मार्ग वापरल्याचे पाहायला मिळाले. ट्रेलर लॉंच सोहळ्यासाठी सारा आणि विकी यांनी चक्क लक्जरी गाडी सोडून ऑटो रिक्षाने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
View this post on Instagram
सारा अली खान आणि विकी कौशल यांनी ट्रेलर लाँचच्या ठिकाणी भव्य एंट्री केली. दोघांनीही ऑटोच्या समोर उभे राहून विविध पोज देखील दिल्या. तसेच यावेळी दोघांनीही स्वागतासाठी असलेल्या ढोल ताशावर डान्स देखील केला. तेवढंच काय तर सारासह विकीने देखील ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळेसचे दोघांचेही व्हिडीओ चांगलच व्हायरल होताहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, तर निर्मिती दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. लव्ह स्टोरीवर आधारित या चित्रपटात कॉलेज वयातील तरुण तरूणी प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात आणि पुढे त्यांचं रूपांतर भांडणात होत अशा कथेवर आधारित आहे. तरुणाईसाठी हा चित्रपट खास असणार असल्याचे निर्मात्यांनी यावेळी सांगितले.