मुंबई – कमाल रशीद खान स्वत:ला मनोरंजन जगतातील सर्वात मोठा समीक्षक मानतात. केआरके नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. आता देखील सोशल मीडियावरील पोस्टमुळे केआरके चर्चेत आला आहे. यावेळी त्याने थेट विराट कोहलीला चित्रपटाची ऑफर दिली आहे.
कमाल आर खानचे हे ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला चित्रपटाबाबत ऑफर दिल्याने तो चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी केआरकेने विराटचा एक डान्स व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 21 सेकंदांच्या या क्लिपमध्ये विराट क्रिकेटच्या मैदानावर डान्स करताना दिसत आहे. यावरूनच प्रभावित होऊन केआरकेने थेट कोहलीला आपल्या ‘देशद्रोही 2’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.
विराट कोहलीचा डान्स व्हिडिओ शेअर करताना कमाल रशीद खानने लिहिले की, ‘विराट कोहलीच्या नृत्य कौशल्याने मी खूप प्रभावित झालो आहे. म्हणूनच मी त्याला माझ्या ‘देशद्रोही 2’ चित्रपटात आयटम नंबर करण्याची ऑफर दिली आहे. केआरकेच्या या ट्विटवर चाहते विराट कोहलीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. कोहली यावर काही भाष्य करणार का याकडे आता सिनेसृष्टीसह क्रिकेट जगताचे देखील लक्ष लागले आहे.
I am very impressed by @imVkohli dance skills, hence I offer him an item number in my film #Deshdrohi2! 🤪🤪😁 pic.twitter.com/E51wZD8m3i
— KRK (@kamaalrkhan) April 14, 2023
केआरके नेहमीच बॉलिवूडसह साऊथ चित्रपटांचे समीक्षण करताना दिसतो. यासाठी तो सोशल मीडियावरून आपले म्हणणे मांडत असतो. विराट कोहलीबद्दल सांगायचे तर तो आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. लीगच्या 16व्या मोसमात कोहलीने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.