मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहात रिलीज झाला. मात्र या चित्रपटाला अपेक्षाप्रमाणे यश मिळाले नाही. ईदनिमित्त रिलीज झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा ककमी प्रतिसाद मिळाला. मात्र आता लवक्ररच सलमान चाहत्यांसाठी एक नवी कोरी फिल्म घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सलमान दिग्दर्शक करण जोहरसोबत एकत्र काम करणार आहे.
मागील काही दिवसांपासून सलमान करण जोहरच्या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर सलमानने यावर मौन सोडले आहे. एका मुलाखतीत सलमान म्हणाला, “करण नेहमी म्हणतो की तो मला खूप घाबरतो. तुझ्या पहिल्या पिक्चरमध्ये मी तुझ्यासोबत काम केल आहे, मग घाबरण्याचं काय कारण आहे.’
पुढे सलमान म्हणाला, ‘करण जोहरचाही चित्रपटात काम करण्यासाठी फोन आला होता. तो एक मोठा निर्माता-दिग्दर्शक आहे, त्यालाही माझ्यासोबत काम करायचे आहे आणि मलाही त्याच्यासोबत काम करायचे आहे. करणला जबरदस्त अॅक्शन सिनेमा बनवायचे आहे.’ दरम्यान, ही एक बिग बजेट अॅक्शन फिल्म असून त्याची स्क्रिप्ट फायनल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान आणि करणचा आगामी चित्रपट 2024 च्या ईदला रिलीज होणार असल्याचे म्हंटले जात आहे. सलमानने याआधी करणच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली होती. आता तब्बल 25 वर्षांनंतर दोघे एकत्र काम करणार असल्याने चाहतेही आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.