हरियाणाची डान्सर आणि गायिका सपना चौधरी भारतभर प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत व तिच्या प्रत्येक व्हिडिओवर ते तुटून पडत असतात.
सपना छोट्या पडद्यावरच्या बिग बॉसच्या घरातही दाखल झाली होती. तेथून बाहेर पडल्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे सपना हा एक ब्रॅंड झाला आहे.
तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यात ती विश्वसुंदरी आणि बच्चन यांची सून ऐश्वर्या रायच्या एका गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. हे गाणे मोहब्बते या चित्रपटातील आहे.
हम को हमी से चुरा लो….हे ते गाणे. सपना जेथे राहते त्या सोसायटीच्या आवारात हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे व त्यातील तिच्या स्टेप्स या तिच्या इमेजला साजेशा अशा नाहीत. ती तिच्या लटके झटक्यांसाठी फेमस आहे.
मात्र, ऐश्वर्याच्या या गाण्यात सपना अगदी फ्रेश दिसते आहे. विशेष म्हणजे तिचे कपडे, एक्स्प्रेशन, तिचे केस आणि वातावरण असे सगळे मस्त जुळून आले आहे. आता फक्त शाहरूख खान तेवढा आला असता तर बरे झाले असते अशा आशयाच्या कॉमेंटस् मिळत आहेत.
या व्हिडिओला तब्बल 3 लाख जणांनी काही तासांतच भेट दिल्यामुळे सपनाची पॉप्युलॅरीटी किती आहे, याचा अंदाज येतो.