मुंबई – राम मंदिरासंदर्भात ‘सामना’त केलेल्या टीकेवर काल भाजपने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केले. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावरून शिवसेनेनं सामनातून उत्तर दिलं. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
अतुल भातखळकर म्हणाले,’जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून, शिवसेनेने सामना बंद करून, बाबरनामा काढावा.’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्यातील वातावरण चांगलंच तापल असून अतुल भातखळकर यांनी ट्विट करत केलेल्या टीकेला शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन त्यांनी #जनाबसेने चा बाबरवादी चेहरा देशासमोर उघडा केला.@BJYM
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
तत्पूर्वी, संजय राऊत म्हणाले आहे की, “जेव्हा जेव्हा शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा राडा झाला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू आहे. त्याच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो.”
शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 16, 2021
राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप झाला आहे. जर ते आरोप राम मंदिराबाबत बदनामीसाठी केले असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा असं ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट म्हटलं आहे. भाजपवर थेट आरोप केलेला नाही. मग ही टीका भाजपला का झोंबली? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही स्वायत्त संस्था आहे, त्यात भाजपचे कार्यकर्ते आहेत का? श्रद्धेच्या वास्तूबाबत खुलासा विचारणं हा गुन्हा झाला का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले. तसंच “ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. आमच्याकडून विषय संपलेला आहे,” असेही त्यांनी म्हटले.