Sanjay Pawar । लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीय. काही ठिकाणी तर उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरु केलाय. असे असताना भाजपने जाहीर केलेल्या राज्यातील उमेदवारांच्या यादीतून एका खासदाराने तिकीट बदलले जाणार आहे. असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्याने केले आहे. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिले आहेत. रक्षा खडसे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु आहे. त्याचवेळी संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
रक्षा खडसेंची उमेदवारी ऐनवेळी रद्द होणार Sanjay Pawar ।
रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द होण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.
रावेरच्या जागेसंदर्भात सस्पेन्स वाढला Sanjay Pawar ।
काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी रावेरच्या जागेबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. भाजप पदाधिकारी रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराजी आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतभेद उघड झाले होते. भाजपच्या गाडीत तुतारीचे कार्यकर्ते फिरत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले होते.