बंगळुरू – भारताची स्टार टेनिसटपूट सानिया मिर्झा लवकरच आपल्याला क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. सानिया मिर्झा क्रिकेट खेळणार नसली, तरी तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची महिलांच्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी) महिला संघाच्या मेंटॉर व मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ती सर्व खेळाडूंना मानसिकता उंचावण्याचे धडे देणार आहे. RCB ने त्यांच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन ही माहिती दिलीय.
सानियाने म्हटले आहे की, मला जेव्हा आरसीबीने हा प्रस्ताव दिला तेव्हा आश्चर्य वाटले. मी एक टेनिसपटू आहे मग एकदम क्रिकेटशी कसे जोडले जायचे हेच उमगत नव्हते मात्र, तरीही एक आव्हान म्हणून हा प्रस्ताव स्वीकारला.
The pioneer in Indian sports for women, a youth icon, someone who has played Bold and broken barriers throughout her career, and a champion on and off the field. We are proud to welcome Sania Mirza as the mentor of the RCB women’s cricket team. 🤩#PlayBold @MirzaSania pic.twitter.com/eMOMU84lsC
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) February 15, 2023
आता भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या महिलांच्या आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघासाठी काम करताना खूप आनंद होणार आहे. एक नवी जबाबदारी आहे व ती समर्थपणे पार पाडण्यासाठी मी देखील सज्ज आहे, असे सानियाने म्हटले आहे.