मुंबई – कोटींच्या कोटी उड्डाणे घेत महिलांच्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव पार पडल्यावर लगेचच पहिल्या मोसमाचे प्राथमिक वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले. यात सलामीचा सामना गौतम अदानींचा (Gautam Adani) गुजराथ जायंट्स व (Mukesh Ambani) मुकेश अंबानींचा मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.
या स्पर्धेत एकूण पाच संघ खेळणार असून त्याची सुरुवात येत्या 4 मार्चपासून होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्चला होणार असून ही संपूर्ण स्पर्धा मुंबईतीलच ब्रेबॉर्न व डॉ. डी. वाय. पाटील याच दोन मैदानांवर होणार आहे. यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू व युपी वॉरिअर्स असे पाच संघ सहभागी होणार आहेत.
🗓️ Mark Your Calendars
Get Ready to support your favourite teams 👏 👏
The schedule for the inaugural edition of Women’s Premier League is here 🔽 #WPL pic.twitter.com/O1HHvRUh0k
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 14, 2023
या स्पर्धेचे साखळी सामने तसेच बाद फेरीच्या लढती एकूण 23 दिवसांत खेळवल्या जातील. यात चार डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील दिवसाचा पहिला सामना दुपारी 3.30 वाजता डबल हेडरच्या दिवशी दुसरा सामना 7.30 वाजता सुरू होईल.
साखळीतील अखेरचा सामना 21 मार्चला यूपी वॉरिअर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार असून एकमेव एलिमिनेटर लढत येत्या 24 मार्चला डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.