Women’s Premier League 2024 : – महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या मोसमाला लवकरच प्रारंभ होत आहे. येत्या 23 फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. या सोहळ्यामध्ये अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेते समारंभाला उपस्थिती लावणार आहेत. वुमन्स प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया आऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. लीगच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच काही फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन आणि कार्तिक आर्यन दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आली आहे.
Yeh Kingdom nahin, Ab Queendom Hai!
Join @Varun_dvn as he fights for the Crown for his Queendom! 🤩
Watch #TATAWPL 2024 Opening Ceremony on @JioCinema & @Sports18 LIVE from the M. Chinnaswamy Stadium, Bengaluru.
🗓️ 23rd Feb
⏰ 6.30 pm
🎟️ https://t.co/jP2vYAVWv8 pic.twitter.com/0R7O1HUsQO— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 21, 2024
ये किंडम नहीं, क्विनडम हैं, वुमन्स प्रीमियर लीगचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी संध्याकाळी ६:३० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिने गेल्या वर्षी सोहळ्यात परफॉर्म केले होते. अभिनेता किर्ती सॅनन आणि गायक एपी धिल्लन यांनीही त्यावेळी परफॉर्म केले होते.
Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?
लीगच्या स्पर्धेतील पहिले 11 सामने बंगळुरू येथे खेळले जातील. यानंतर, पाच संघ दिल्लीला येतील, जिथे एलिमिनेटरसह अंतिम सामना खेळला जाईल. लीग राउंडमध्ये 20 सामने खेळले जातील आणि त्यानंतर एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळवला जाईल. यावेळी या लीगचे यजमानपद बेंगळुरू आणि दिल्लीला देण्यात आले आहे.