प्रभात वृत्तसेवा
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवड्णूक महाविकास आघाडी आणि माहयुतीच्या घटक पक्षांनी प्रतिष्ठेची केली असतानाच; या निवडणूकीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि साईनाथ बाबर यांच्यावर सोशल मिडीयात टोकाचा वाद पेटला आहे. भाजपला पाठींबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोशल मिडीयावर टिका केली. त्याला, साईनाथ बाबर यांनीही चोख प्रयुत्तर दिल्यानंतर हा वाद सोशल मिडीयावर चांगलाच रंगला आहे. त्यामुळे, कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत प्रचाराने राजकीय वातावरण तापलेले असतानाच; मनसे- राष्ट्रवादीतील वाद चर्चेचा ठरला आहे.
काय आहे प्रकार?
मनसेने भाजपला पाठींबा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांनी साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्याच्या लग्नात सुपारी घेऊन नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोडयावर बसा असे खोचक ट्विट केले. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांताच साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना उद्देशून ” लग्न लोकाच नाचतय येडया… ” असे ट्विट केले. हे ट्विट जिव्हारी लागलेल्या जगताप यांनी पुन्हा ट्विटरवरून बाबर यांच्यावर खोचक टिका केली आहे.
साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा. – एक निराश मंदसैनिक
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
लग्न लोकाचं @JagtapSpeaks नाचतंय येड्या भो..च#कसबाविधानसभापोटनिवडणूक
— Sainath Babar (@Sainathbabar7) February 15, 2023
“साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये. तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर.” असा मेसेज केला आहे, बाबर यांनी त्याला अद्याप प्रयुत्तर दिले नसले तरी हा वाद पुण्याच्या राजकीय वर्तूळात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये.
तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. https://t.co/K9RBwu7Q0T— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023