Salman Khan | Dubai | Bollywood – चित्रपट अभिनेता सलमान खान आज (शुक्रवारी) कडेकोट बंदोबस्तात दुबईला रवाना झाला. बिश्नोई गँगने नुकताच सलमानच्या येथील घरावर गोळीबार केला होता. यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी सलमानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. पोलिसांनी गोळीबाराप्रकरणी बिश्नोई गँगच्या 2 हस्तकांना अटक केली आहे.
या पार्श्वभूमीवर सलमान शुक्रवारी दुबईच्या दिशेने रवाना झाला. चोख बंदोबस्तात गाडीतून उतरून विमानतळाकडे जातानाचा सलमानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. । Salman Khan | Dubai | Bollywood
View this post on Instagram
सलमानच्या घरावर चार राउंड फायर; नेमकं काय घडलं….
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की पाल आणि गुप्ता या दोघांनाही तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी नियुक्त केले होते. प्रत्यक्ष गोळीबार पाल याने केला. त्यापुर्वी हे दोघेही गुप्त टोळीच्या संपर्कात होते.
रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान यांच्या घराबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चार राऊंड गोळीबार केला आणि तेथून पळ काढला होता.
त्यामुळे मोठीच खळबळ उडाली होती. या दोघांनी नवी मुंबईतील पनवेल येथे एका महिन्यासाठी घर भाड्याने घेतले होते, जिथे सलमानचे फार्महाऊस आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. । Salman Khan | Dubai | Bollywood