नवी दिल्ली – यशस्वी जैस्वालच्या झंझावाती खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 312 धावा केल्या आहेत. यावेळी कारकिर्दीतील पहिली कसोटी खेळणाऱ्या यशस्वीने मोलाचे योगदान दिले.यशस्वीने खास सुरुवात करत दुसऱ्या दिवसापर्यंत १४३ धावा केल्या.
आता यशस्वी जैस्वाल पदार्पणाच्या कसोटीत भारतासाठी शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीचे मैदानापासून ड्रेसिंग रुमपर्यंत एका खास पद्धतीने स्वागत करण्यात आले, याचा व्हिडिओ बीसीसीआय आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला, यशस्वी विराट कोहलीसह ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालताना दिसत आहे. यामध्ये जडेजाने सर्वप्रथम त्याला मिठी मारून अभिनंदन केले. यानंतर तो पुढे पोहोचताच संघातील सर्व खेळाडूंनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे कौतुक केले.
A special Debut ✨
A special century 💯
A special reception in the dressing room 🤗
A special mention by Yashasvi Jaiswal 👌🏻
A special pat on the back at the end of it all 👏🏻#TeamIndia | #WIvIND | @ybj_19 pic.twitter.com/yMzLYaJUvR— BCCI (@BCCI) July 14, 2023
व्हिडिओच्या शेवटी, तो कर्णधार रोहितसोबत हसताना दिसत आहे, रोहितने नंतर त्याच्या पाठीवर थाप मारली आणि हसून आनंद व्यक्त केला. यशस्वीने आपली खास खेळी कुटुंबाला समर्पित करून आपल्या यशाचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना आणि मदत करणाऱ्या प्रत्येकाला दिले आहे.