बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने एकापेक्षा एक हिट चित्रपट त्याने दिले. आजही सलमान खानची तरुण-तरुणींमध्ये मोठी क्रेझ आहे. यासोबतच अनेक वेगवेगळ्या स्टाईलही प्रसिद्ध झाल्या आहेत. सलमान खान आपल्या प्रत्येक चित्रपटात एकदा तरी शर्टलेस होतोच. यावेळी तो कुठल्या चित्रपटामध्ये नव्हे तर इंस्टाग्रामवर शर्टलेस फोटो शेअर केला आहे.
नुकताच सलमानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्या फोटोवरून चाहते त्याची मस्करी करत आहेत. ‘बिईंग ह्युमन’ या त्याच्या ब्रँडचे हिवाळी कलेक्शन लवकरच येणार असल्याचं त्याने सांगितलंय. विशेष म्हणजे हिवाळी कलेक्शनची घोषणा करताना सलमानने त्याचा शर्टलेस फोटो पोस्ट केला.
वर्कफंटबाबत सांगायचं झाल्यास, सलमान खानचा “राधे’ चित्रपटास निर्माता-दिग्दर्शक ओटीटीवर रिलीज करू शकतात. याबाबत सध्या डील सुरू आहे. जर निर्मात्यांना वेब प्लॅटफॉर्मने योग्य मोबदला दिल्यास यावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल.