बॉलीवूडचे आवडते जोडपे करीना कपूर आणि सैफ अली खान जेव्हा जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा त्यांना पैपराजीकडून वेढले जाते. अशात करीना कपूर नेहमीप्रमाणे पोझ देते पण सैफला ते अजिबात आवडत नाही.
अलीकडेच करीना कपूर खान आणि सैफ अली खान त्यांची मैत्रिण मलायका अरोराच्या पार्टीत पोहोचले होते जिथे लोकांनी दोघांना पाहून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक करायला सुरुवात केली. जेव्हा पापाराझींनी सैफ अली खानला पोज देण्यास सांगितले तेव्हा त्याचा राग अनावर झाला. यानंतर सैफ अली खान रागाने म्हणाला, ‘तुम्ही सर्व आमच्या बेडरूममध्ये फोटो काढायला या.’
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, करीना कपूर खान आणि सैफ अली खान काळ्या कपड्यांमध्ये हातात हात घालून फिरताना दिसत आहेत, परंतु जेव्हा पापाराझींनी त्यांना पोज देण्यास सांगितले तेव्हा सैफ म्हणू लागला, ‘एक काम कर, आमच्या बेडरूमपर्यंत ये.’ हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांना समजले की आज सैफ अली खानचा मूड चांगला नाही, पण सैफ हे बोलत असताना त्याचवेळी पापाराझींना पाहून करीना हसली. एकीकडे सैफ अली खानला हे सर्व अजिबात आवडत नाही, तर दुसरीकडे करीना कपूर पापाराझींना कधीच नाही म्हणत नाही.
करीना आणि सैफच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आगामी काळात सैफ अली खान ‘आदि पुरुष’ चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षीच या चित्रपटातील सैफ अली खानचा लूक पोस्टर शेअर करण्यात आला होता, ज्याने मोठा गोंधळ निर्माण केला होता. त्याचबरोबर करीना कपूर आगामी काळात ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मध्ये दिसणार आहे.