पुणे – येथे सुरू असलेल्या सदू शिंदे लीग स्मृतिचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात “सिन्टेल क्रिकेट क्लबने थंडर्स क्रिकेट क्लबवर एक धावेने मात केली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात प्रथम खेळताना “थंडर्स’नी 27.5 षटकांत 9 बाद 120 धावा केल्या. त्यामध्ये कुणाल सुर्वेच्या 32, सुधांशु क्षीरसागरच्या 19, उत्कर्ष इनामदारच्या 14 आणि प्रद्युम्न विश्वकर्माच्या 13 धावांचा समावेश होता. सिन्टेलच्या हृषिकेश उडाळेने 43 धावांत 4 विकेट्स घेतल्या. नंतर सिन्टेल संघाने 1 बाद 121 धावा करून विजय मिळवला.
त्यामध्ये ऋतुपर्ण भावेच्या नाबाद 63 आणि साबीर शेखच्या नाबाद 31 धावांचा समावेश होता. सिन्टेलच्या कुणाल सुर्वेला एकमेव बिकेट मिळाली. त्यासाठी त्याला 30 धावा मोजाव्या लागल्या.