रानू मंडल यांना सलमानने फ्लॅट दिल्याची निव्वळ अफवा?

आपल्या सुरेल आवाजामुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना सलमान खानने 55 लाखांचा फ्लॅट भेट दिला अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे त्यांच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे.

सलमानने रानू यांना घर भेट दिलेले नाही, या केवळ अफवा आहेत असे रानू मंडल यांचे काम पाहणारे अतिंद्र चक्रवर्ती यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सलमानने दबंग 3 मध्ये गाण गाण्याची संधीही रानू यांना दिल्याचे म्हटलं जात होते. मात्र, या चर्चादेखील चक्रवर्ती यांनी फेटाळल्या आहेत. रानू यांना ज्या चॅनेलने मंचकावर येऊन गाण गाण्याची संधी दिली त्या चॅलनने स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे आधार कार्ड तयार करुन घेतले असेही ते म्हणाले.

रानू यांच्या सुरेल आवाजाने अनेकजण प्रभावित झाले आहे. त्यांना बॉलिवूडमधल्या अनेक गायकांनी संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खुद्द ए आर रेहमान, सोनू निगम यांसारख्या गायकांनी रानू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही ते म्हणाले रानू यांचे बहूतांश आयुष्य हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेले. पश्‍चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणे गाऊन त्या आपले पोट भरायच्या. मात्र, एका व्हायरल व्हिडिओने त्यांचे संपुर्ण आयुष्याच बदलून टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)