आदित्य ठाकरेंवर अनुभवावरुन केली होती टीका
मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची एकही संधी भाजपा सोडताना दिसत नाही. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांच्या अनुभवावरुन टीका केली होती. त्यांच्या या टिकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर न देता आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
.@ChDadaPatil अनुभवापेक्षा @AUThackeray जी यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता, असं मला वाटतं.
तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळं तर तुम्ही ‘अनुभवावर’ बोलत नाहीत ना?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020
चंद्रकांत पाटील तुम्ही अनुभवापेक्षा आदित्य ठाकरे यांची कामं बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भुमिका तुम्ही पार पाडू शकता, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. तसेच अनुभवावरून बोलताना, तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या अनुभवावर तर तुम्ही बोलत नाही ना? अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांना सुनावले आहे. त्याचबरोबर ‘भाजपावर आलेले सध्याचे बुरे दिन हे अहंकाराचा फळं आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आशिष शेलार यांना देखील उत्तर दिले आहे.
भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले “अच्छे दिन” हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले “बुरे दिन” हे अशाच अहंकाराचं फळ आहे. #आत्ता_तरी_सुधरा_राव @ShelarAshish https://t.co/aIMXaZEiSr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या अनुभवावरून शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. कोणताही अनुभव नसताना उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले असल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच टीकेला रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.