टेनिस स्पर्धेत रोअरिंग लायन्स अंतिम फेरीत

पुणे – रोअरिंग लायन्सने फ्लाईंग हॉक्‍सचा 38-36 असा पराभव केला आणि पुणे महानगर जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) आयोजित पीएमडीटीए ज्युनिअर टेनिस लीग स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात नील केळकरने सक्षम भन्साळीचा 4-0 असा तर मुलींच्या गटात मृणाल शेळकेने जसलीन कटरियाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करीत लायन्स संघाला आघाडी मिळवून दिली. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात रुमा गायकैवारीने अंजली निंबाळकरचा 6-0 असा सहज पराभव करीत संघाची आघाडी कायम राखली.

14 वर्षाखालील दुहेरी गटात अर्जुन अभ्यंकर व वेदांत ससाणे यांनी श्‍लोक गांधी व तनिष बेलगलकर यांचा 6-2 असा पराभव केला. 10 वर्षाखालील दुहेरी गट आर्यन कीर्तने व संमिहन देशमुख या जोडीने देव गुहालेवाला व नीव गोजिया यांचा 4-0 असा पराभव करीत संघाची अंतिम फेरी निश्‍चित केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

रोअरिंग लायन्स विवि फ्लाईंग हॉक्‍स : 38-36 (एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: श्रावी देवरे पराभूत वि अंशुल पुजारी 3-4 ; 10 वर्षाखालील मुले : नील केळकर विवि सक्षम भन्साळी 4-0 ; 10 वर्षाखालील मुली: मृणाल शेळके विवि जसलीन कटरिया 4-0; 12 वर्षाखालील मुले : आरूष मिश्रा पराभूत वि अर्जुन कीर्तने 3-6 ; 12 वर्षाखालील मुली : रितिका मोरे पराभूत वि श्रावणी देशमुख 2-6. 14 वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे पराभूत वि सुधांशू सावंत 4-6;

14 वर्षाखालील मुली : रुमा गायकैवारी वि.वि अंजली निंबाळकर 6-0; कुमार दुहेरी गट: प्रणव इंगळे व रियान मुजगुले पराभूत वि पार्थ देवरुखकर व चिराग चौधरी 2-6 ; 14 वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर व वेदांत ससाणे वि.वि श्‍लोक गांधी व तनिष बेलगलकर 6-2; 10 वर्षाखालील दुहेरी गट: आर्यन कीर्तने व संमिहन देशमुख वि.वि देव गुहालेवाला व नीव गोजिया 4-0; मिश्र दुहेरी गट: डेलिशा रामघट्टा व अथर्व जोशी पराभूत वि कौशिकी समंथा व तेज ओक 0-6.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here