राष्ट्रीय आईस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची कौतुकास्पद कामगिरी

पुणे – गुरुग्राम, हरयाणा येथे नुकत्याच झालेल्या सोळाव्या राष्ट्रीय आईस स्केटिंग स्पर्धेत पुण्याच्या मुला-मुलींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत 14 पदकांची कमाई केली आणि महाराष्ट्राला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

स्पर्धेतील 10 वर्षाखालील गटात आरव पटवर्धन (सुवर्ण), ओजस कुलकर्णी (रौप्य), अद्वय कोठारी (ब्रॉंझ) तर मुलींमध्ये स्वरूपा कड-देशमुख(सुवर्ण), तेरा वर्षाखालील खालील गटात प्रियांशू साळवे (रौप्य), सिद्धार्थ वराडे (ब्रॉंझ) तर तेरा वर्षाखालील मुलींमध्ये अनन्या वंदेकर(सुवर्ण), ईश्‍वरी माळी (ब्रॉंझ), पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये ओम मुरकुटे (ब्रॉंझ) आणि मुलीमध्ये पी. संजना (रौप्य) व सिद्धी ढोरे(ब्रॉंझ) पदक पटकावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी प्रथमच आठ वर्षाखालील मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये सिद्धांत मांडगे(सुवर्ण) रियांश खानखोजे (रौप्य) शौर्य इंगलकर (ब्रॉंझ) यांचीही कौतुकास्पद कामगिरी झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर आईस स्केटींगसाठी कार्यरत असणाऱ्या पुण्यातील स्नोव्हीट क्‍लबचे डॉ विपुल लुनावत व सुबोध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मुले सराव करीत आहेत. हे स्पर्धक कर्नाटक हायस्कूलच्या पटांगणावर तसेच औंधमधील एस. के. पी. शाळेवर दररोज तर मुंबईमधील एस्सेल वर्ल्ड आईस रिंकवर सराव करतात.

भारतीय आईस स्केटिंग असोसिएशनतर्फे सुवर्णपदक विजेत्यांना 5 हजार रुपयांचे पारितोषिक व विशेष पदक देण्यात आले. डिसेंबरमध्ये मलेशियात होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी या स्केटर्सची निवड करण्यात आली आहे. चार वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक चुन ली क्‍युंग यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)