नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’

युतीचाच विजय होणार – मुख्यमंत्री

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. प्रचार संपायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या काही तासांत प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोडशोला नागपूरात सुरूवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत युतीचा विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला आहे.


दक्षिण पश्‍चिम नागपूर मतदार संघातून मुख्यमंत्री निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पत्नीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोडशोमध्ये सहभागी झाले आहे. येत्या 21 ऑक्‍टोबरला महाराष्ट्रात मदतान होणार आहेत. तर 25 ऑक्‍टोबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. दक्षिण पश्‍चिम नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या मतदार संघात दोन सभा झाल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत युतीचा विजय होईल, महाराष्ट्रात युती नवा विक्रम रचेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.