२०२० च्या ईदला ‘सलमानचा’ धमाका, ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाची घोषणा

मुंबई – बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या आगामी दबंग 3 चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्यातच त्याने आता प्रेक्षकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. ती म्हणजे सलमान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा तिसऱ्यांदा एकत्रित काम करणार आहेत. वॉन्टेड आणि दबंग 3 नंतर दोघांची जोडी नव्या सिनेमासाठी सज्ज झाली आहे. राधे – युवर मोस्ट वॉन्टेड भाई असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्याचे ट्विट चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडिवार शेअर केले आहे.

दरम्यान, ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट २०२० च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. सलमान खान यंदाच्या ख्रिसमसमध्ये दबंग ३ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर पुढील वर्षी ईदला ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट भेटीस येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.