विधानसभेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण

अटी-शर्तींवर 231 जणांना शहरात वास्तव्य

नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून यासाठी आवश्‍यक सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात आल्या आहेत. सोमवारी,दि.21 मतदान व गुरुवारी,दि.24 मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधीत सर्व विभागांचा आढावा घेतला आहे. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेलाही दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.

बारा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हयात 5 ऑक्‍टोबर,2019 अखेर एकूण 34 लाख 73 हजार 743 मतदार असून त्यामध्ये 18 लाख 7 हजार 853 पुरुष मतदार, तर 16 लाख 65 हजार 733 स्त्री मतदार व 157 अन्य मतदार आहेत. मतदारसंनिहाय मतदारसंख्येचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अकोले मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 54 हजार 204 आहेत.
संगमनेर मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 69 हजार 689 आहेत.
शिर्डी मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 62 हजार 686 आहेत.
कोपरगांव मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 64 हजार 832 आहेत.
श्रीरामपूर मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 87 हजार 325 आहेत.
नेवासा मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 62 हजार 770 आहेत.
पाथर्डी-शेवगांव मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 40 हजार 860 आहेत.
राहूरी मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 91 हजार 474 आहेत.

पारनेर मतदारसंघात 1 लाख 66 हजार 405 पुरुष, 1 लाख 53 हजार 443 स्त्री मतदार असून एकूण मतदार 3 लाख 19 हजार 848 आहेत.
नगर शहर मतदारसंघात 1 लाख 49 हजार 91 पुरुष, 1 लाख 40 हजार 464 स्त्री, अन्य 74 मतदार असून एकूण मतदार 2 लाख 89 हजार 629 आहेत.
श्रीगोंदा मतदारसंघात 1 लाख 62 हजार 412 पुरुष, 1 लाख 47 हजार 942 स्त्री, अन्य 3 मतदार असून एकूण मतदार 3 लाख 10 हजार 357 आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 20 हजार 69 आहेत.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीन जनांना हद्दपार करण्यात आले. तर 231 जणांना अटी व शरती नुसार शहरात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आजी-माजी नगरसेवकांसह अनेकांचा समावेश आहे. असा आदेश प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारी स्वरूपाचे विविध खटले दाखल असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या संदर्भातील अहवाल संबंधित प्रांताधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातून हद्दपार सुनील अंबादास तांबे, (रा.घोडेगाव), आशपाक उर्फ बाबा निसार शेख (रा.चांदा), गोरख करांडे (रा. देहरे) केले.नगर शहरातील भिंगार पोलीस ठाणे हद्दीतील 101, तोफखाना पोलीस ठाण्यातील 92, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंतर्गत 38 अशा एकून 231 जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.