Rinku Rajguru | अभिनेत्री रिंकु राजगुरुला ‘सैराट’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. नुकतेच जळगावमध्ये शासनाकडून महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला रिकूंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिकूंला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीत रिंकुला एका चाहत्याचा धक्का लागला. यामुळे ती संतापल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रम संपल्यानंतर रिंकु बाहेर पडत असताना सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतून बाहेर पडताना रिंकुला चाहत्याचा धक्का लागल्यामुळे ती चिडली. ‘तुमची मुलगी या जागी असती तर तुम्हाला चाललं असतं का? ‘असा सवाल रिंकुने चाहत्यांना केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Rinku Rajguru |
दरम्यान, या कार्यक्रमात रिकूंने सैराट चित्रपटातील डायलॉग खानदेशी भाषेत देखील बोलून दाखवले. यावेळी प्रेक्षकांचा देखील तिला मोठा प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडल्यानंतर गर्दीतून बाहेर पडताना रिंकूला त्रास सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. Rinku Rajguru |
रिंकुच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकू ‘मेकअप’, ‘कागर’ ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. अभिनेत्री लारा दत्तासोबत तिने ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्येही काम केले होते. रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहात रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.
हेही वाचा:
“…तर फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे”; ठाकरे गटाची मागणी