Income tax Raid Tobacco Company। कानपूर येथील बंशीधर टोबॅको कंपनीच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकलाय. दिल्ली, मुंबई आणि गुजरातसह तंबाखू कंपनीच्या सुमारे 20 ठिकाणांवर ही छापेमारी सुरु आहे. 29 फेब्रुवारीला सुरू झालेल्या छाप्याचा आजचा पाचवा दिवस आहे. छापेमारीत आयकर विभागाला अशा काही गोष्टी आढळून आल्यात ज्यामुळं सर्वानाच धक्का बसला आहे. यात प्रामुख्यानं १०० कोटींहून अधिक करचोरी आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्राप्तिकर विभागाने गोपनीय कागदपत्रे, पासवर्ड संरक्षित हार्ड डिस्क आणि लॅपटॉपही या छापेमारीत जप्त केले आहे. हे सर्व साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. पाच कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आलीय. याशिवाय आयकर विभागाच्या पथकाने तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाच्या दिल्लीतील घरातून 12 कोटी रुपयांची पाच डायमंड घड्याळे जप्त केलीत. यापूर्वी 60 कोटींहून अधिक किमतीच्या अनेक गाड्या सापडल्या होत्या. अनेक शेल कंपन्याही उघड झाल्यात.
कंपनीने आयकर विभागाला 20 ते 25 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असल्याचे दाखवले होते पण प्रत्यक्षात कंपनीचा टर्नओव्हर 100-150 कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचे मालक केके मिश्रा यांची आयकर विभागाच्या टीमकडून कागदपत्रांसह चौकशी केली सूर आहे. मात्र, मिश्रा यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत प्रश्न टाळले. त्याच्यावर नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले.
60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या सापडल्या Income tax Raid Tobacco Company।
या कारवाईदरम्यान कंपनीचे मालक केके मिश्रा यांचा मुलगा शिवमजवळ आलिशान वाहनांचा ताफा सापडला. यामध्ये लॅम्बोर्गिनी आणि फेरारी सारख्या कारचा समावेश आहे. मिश्रा यांच्या दिल्लीतील घरातून 16 कोटी रुपयांची रोल्स रॉइस फँटम कारही सापडली .
बंशीधर टोबॅको लिमिटेडवर कारवाई का करण्यात आली? Income tax Raid Tobacco Company।
प्राप्त माहितीनुसार,आयकर विभागाने या प्रकरणासंदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकले, ज्यात मिश्रा यांचे गुजरातमधील घर, दिल्लीतील घर, कानपूरमधील कार्यालय आदींचा समावेश आहे. कंपनीने कोणत्याही कागदपत्रांशिवाय हा माल बड्या पान मसाला ग्रुपला विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आयकर विभाग पान मसाला ग्रुपवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.