नवी दिल्ली – शबरीमला मंदिरात महिलांना दर्शनासाठी कोर्टाने जी अनुमती दिली आहे त्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी जी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यावर आज निकाल दिला जाणार आहे. या संबंधात एकूण 65 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या मूळ निकालानंतर त्यांची अत्यंत विपरीत प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटली होती. स्त्रीपुरूष समानतेच्या अनुषंगाने या निर्णयाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
कोर्टाकडून आज राफेल गैर व्यवहार प्रकरणातहीं निकाल दिला जाणार आहे. केंद्र सरकारने राफेल विमान खरेदी करार केला त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला आहे. तथापी या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली होती. या क्लीन चिटलाच आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यावर एकत्रित सुनावणी घेण्यात आली असून त्याचाही निकाल उद्याच येणार आहे.