मुंबई – शास्त्रज्ञांनी देशात प्रथमच करोना विषाणूला चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी उंदरांवर संशोधन केले आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी तीन प्रजातीतील 34 उंदरांवर संशोधन केल्यानंतर असे आढळले की, सीरियाई उंदरांवर मानवासारखाच करोना विषाणू प्रभाव पाडतो.
मानवात करोना विषाणूचा प्रभाव पाच ते सात दिवसांनंतर दिसायला लागतो. तर मानवी शरीरात विषाणूविरोधी ऍन्टीबॉडी सात ते दहा दिवसांत तयार होते. सार्स आजार आला होता तेव्हाही उंदरांवर संशोधन करण्यात आले होते. 16 बीएएलबी/सी57, बीएल6 प्रजातीचे उंदीर आणि 18 गोल्डन सररियाई हेमेस्टर प्रजातीच्या उंदरांवर संशोधन करण्यात आले आहे.
या संशोधनात करोना विषाणू प्रभावाविषयी काही माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे. हे संशोधन पुढे सुरू ठेवून करोना विषाणू प्रभावाविषयी आणखी माहिती मिळणार आहे.