रेडमी नोट ‘7प्रो’ची हवा…

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये सध्याच्या घडीला चायनीज स्मार्टफोन मेकर्सची हवा आहे. रेडमी, वनप्लस, ओप्पो, व्हिवो यांसारख्या चायनीज कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी असल्याचे पाहायला मिळते. यासर्वांमध्ये रेडमी कंपनीच्या स्मार्टफोन्सना सर्वाधिक डिमांड असून भारतातील एकूण स्मार्टफोन बाजारपेठेचा 40% शेअर सध्या रेडमीकडे आहे.

रेडमीने काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये आपला लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी नोट 7प्रो उतरवला असून त्याची विक्री एका ई-कॉमर्स साईटवर “फ्लॅश सेलच्या’ माध्यमातून सुरु आहे. रेडमीने आपल्या नोट 7प्रो या स्मार्टफोनमध्ये देखील लेटेस्ट फीचर्स आणि अफोर्डेबल प्राईझ हा फंडा सुरु ठेवला असल्याने या स्मार्टफोनच्या फ्लॅश सेलला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. रेडमी नोट 7प्रो मध्ये सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेला वॉटर ड्रॉप डिस्प्ले, पोर्ट्रेट मोड फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा, आकर्षक लूकसाठी ग्लॉसी बॅक, स्मूथ यूजर एक्‍सपीरियन्ससाठी लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, आणि गेमिंगसाठी स्ट्रॉंग प्रोसेसर आणि पुरेशी रॅम अशी फीचर्स देण्यात आली आहेत.

रेडमीच्या नोट 7प्रो बरोबरच सध्या मार्केटमध्ये सॅमसंग गॅलेक्‍सी एम 30 आणि रिअलमी 3 प्रो या स्मार्टफोन्सना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये देखील रेडमी नोट 7 प्रो प्रमाणेच नव्या जमाण्याची फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र सध्या हवा रेडमी नोट 7 प्रोचीच असल्याचं चीत्र आहे.

– प्रशांत शिंदे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.