नवी दिल्ली – भारतीय सशस्त्र दल आणि जपानच्या सेल्फ-डिफेन्स फोर्स यांच्यात आपसातील पुरवठा व सेवांच्या संदर्भातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुझुकी सतोशी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारामुळे भारत आणि जपानच्या सशस्त्र सैन्यामध्ये पुरवठा व सेवांच्या परस्पर व्यवहारात सहकार्यासाठी सक्षम आराखडा तयार होण्यास मदत होईल.
भारत आणि जपान दरम्यान द्विपक्षीय कार्यक्रम, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमा, मानवी आंतरराष्ट्रीय मदत आणि परस्पर संमत केलेल्या कृतींना या आराखड्यात समाविष्ट करण्यात येईल.
या करारामुळे भारतीय सशस्त्र सेना आणि जपान यांच्यात परस्पर कार्यक्षमता वाढेल आणि त्याद्वारे दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अंतर्गत द्विपक्षीय संरक्षण गुंतवणुकीत आणखी वाढ होईल.