768 टपाली मतपत्रिका प्राप्त

विधानसभा स्तरावर 463, जिल्हास्तरावर 323 टपाली मतपत्रिका मिळाल्या

नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019अंतर्गत -37अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी वाटप केलेल्या टपाली मतपत्रिकांपैकी दिनांक 22 एप्रिलअखेर विधानसभा मतदारसंघ स्तरावर 463 तर दिनांक 26 एप्रिलअखेरजिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकूण 323 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

या टपाली मतपत्रिकासोबतची घोषणापत्र (डिक्‍लेरेशन) तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांच्याकडूनही साक्षांकित करुन घेता येतील, असे त्यांनी सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले. टपाली मतदारांना मतदान करता यावे, यासाठी विधानसभा मतदारसंघ स्तरावर एकूण 13 हजार 178 टपाली मतपत्रिका वाटप करण्यात आल्या होत्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप केलेल्या टपाली मतपत्रिकांची संख्या आणि मतदान करुन संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये प्राप्त झालेली टपाली मतपत्रिकांची पाकिटांची संख्या (कंसात) पुढीलप्रमाणे-222 -शेवगाव-पाथर्डी- 2637 (25), 223-राहुरी- 1723 (29), 224-पारनेर-2490 (94), 225- अहमदनगर शहर -2109 (205), 226-श्रीगोंदा-2352 (35) आणि 227 -कर्जत-जामखेड-1867 (05). यापुढे टपाली मतपत्रिका पाठविताना संबंधितांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे 23 मेपूर्वी पोहोचतील, या बेताने पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.