महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग

झाडांची छाटणी, तारांचे झोळ काढणे आदी कामे प्रगतिपथावर

विजेचा लपंडाव टाळण्यासाठी खटाटोप

सोसाट्याच्या वाऱ्याने शॉर्टसर्किटची शक्‍यता
पावसाळा सुरू होतांना सुटणारा सोसाट्याचा वाऱ्याने तारा एकमेकांवर घासल्या जावून अथवा झाडांमध्ये घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्‍यता असते त्यासाठी तारांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे असते तसेच तारांमधील झोळ कमी करणे गरजेचे असते.त्यासाठी पावसाळ्या पुर्वी ही मोहिम हाती घेतली जाते. अन्यथा पावसाळ्यात वादळ वारे सुरू होताच वीजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते.असे एमएस ई बीच्या वतीने निलेश ओहोळ यांनी सांगितले.

नगर – पावसाळा सुरू झाला कि वीजेचा लपंडाव रंगण हे काही नवीन गोष्ट राहिलेली नाही मात्र , वीजेचा लपंडाव कमीत कमी व्हावा या हेतूने एम एस ई बीच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रीमान्सून मेंटेनन्सच्या कामांना सुरवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात झाडांची छाटणी करण्याचे लाम जाती घेण्यात आले आहे. पावसाळा एक ते सव्वा महिन्यावर येवून ठेपला असतांना या कामांना सुरवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गजानन हॉस्पिटल ते लालटाकी परिसरातील जवळपास 10 झाडांची छाटणी करण्यात आली आहे.

पुढच्या टप्प्यात त्या पुढच्या झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. प्री मान्सून च्या कामांमध्ये आवश्‍यक त्याठिकाणी वीजेच्या खांबांना आधार देणे. तारातील झोळ कमी करणे,कमकुवत झालेल्या तारा बदलणे आदी कामे केली जातात. ही कामे करतांना शट-डाऊन घेण्याची गरज असल्याने मुख्यत्वे ही कामे शनिवारीच केली जातात.त्या मध्ये झाडांच्या छाटणीची कामे करण्यास प्रारंभ आज पासून करण्यात आला आहे. यापुढील टप्प्यात खांबांना आधार देणे, खांबांचे बेंड काढणे, तारा ओढुन त्यांना ताण देणे .त्याचबरोबर कमकुवत तारा बदलणे, तारांमधील झोळ कमी करणे, डीपीची मेंटेनन्सची कामे उरकली जाणार आहेत . प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.