लखनौ – बहुजन समाज पक्षाने (बसप) लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशातील उमेदवारांच्या २ याद्या जाहीर केल्या. त्यामध्ये मिळून २५ उमेदवारांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपने यावेळी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
तो पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया या दोन्ही प्रमुख आघाड्यांपासून दूरच राहिला आहे. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा आहेत. मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) बसपने सपशी आघाडी केली होती.
त्या आघाडीने १५ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये बसपचा वाटा १० जागांचा होता. यावेळी स्वतंत्रपणे लढणाऱ्या बसपपुढे एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांचे आव्हान आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या कामगिरीविषयी उत्सुकता आहे.