मुंबई – भोजपुरी सुपरस्टार रवी किशन हे भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते तर आहेतच, पण बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावरही त्यांनी खूप नाव कमावले आहे, त्यामुळेच आज रवी किशन यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. रवी किसान हे राजकारणात सक्रिय असून ते भाजप खासदार आहे.
अलीकडेच, रवी किशन इंडस्ट्रीच्या कास्टिंग काउचबद्दल बोलले आणि यावेळी त्यांनी अनेक खुलासे देखील केले. रवी किशन यांनी सांगितले कि ते कसे या इंडस्ट्रीच्या कास्टिंग काउचला बळी पडण्यापासून वाचवले. रवी किशन इंडस्ट्रीत नवे होते तेव्हा सुरुवातीला कामाच्या शोधात असताना ही त्यांना कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवी किशन यांनी सांगितले की, ‘एका पार्टीत मला सांगण्यात आले, रात्री कॉफी घ्यायला या. त्यानंतर मला वाटले की लोक दिवसभरात कॉफी पितात, म्हणून मला समजले आणि मी ते टाळू शकलो. मात्र, रवी किशन यांनी अशा सेलिब्रिटीचे नाव घेण्यास नकार दिला कारण ते फक्त याबाबत पुढे बोलतांना म्हणाले, ते इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे.’
त्याचवेळी रवी किशनने देखील कबूल केले की, ‘मी नेहमीच कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवतो आणि शॉर्टकटवर नाही, म्हणून जेव्हा मला अशी ऑफर आली तेव्हा मी स्वतःला त्यापासून वाचवले.’
रवी किशन यांनी आपल्या करिअरची सुरुवात फक्त हिंदी चित्रपटातून केली होती. 1993 मधला पितांबर हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी तमिळ, भोजपुरी, इंग्रजी, तेलुगू, मराठी, कन्नड, गुजराती, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण सगळ्यात जास्त त्याला प्रसिद्धी भोजपुरी आणि हिंदी चित्रपटात मिळाली.