मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्व आणि मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलच ढवळून निघत आहे. त्यातच आता एमआयएमने एन्ट्री घेतली आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथील खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात तापणार असं चित्र दिसत आहे. यावर आता बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बिन्दास्त शैलीसाठीही ओळखली जाते. यावरून रविना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
रविनाने एक ट्विट शेअर करत लिहिले की, ‘माझ्या जन्मभूमीला “असहिष्णु’ असे लेबल लावणे ही काही काळापूर्वीच एक फॅशन बनली आहे. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होते. हे एक उदाहरण आहे. असहिष्णुता आहे कुठे?” असही म्हटले आहे.
दुसरीकडे, रवीना टंडनने लेखक आनंद रंगनाथन यांचे ट्विट शेअर केले आणि लिहिले की,’आम्ही एक सहनशील प्रजाती आहोत, आहोत आणि राहू. भारत स्वतंत्र देश आहे, इथे कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत.’
लेखक आनंद रंगनाथन यांनी माथा टेकण्यासाठी आलेल्या ओवेसींचा फोटो शेअर करताना औरंगजेबावर निशाणा साधला होता. आनंद रंगनाथन यांच्या ट्विटला रवीनाने प्रत्युत्तर दिले आहे. दुसऱ्या ट्विटने ती प्रत्यक्षात असहिष्णू टोळीला लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, रवीना टंडन ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि भरपूर कमाई केली. हा चित्रपट अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिस (KGF 2 बॉक्स ऑफिस) चे अनेक रेकॉर्ड मोडले आणि सध्याच्या काळातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनला. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘KGF 2’ आता 1200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.