बारामती – पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अटक केली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासावी, अशी लाजीरवाणी घटना बारामतीमध्ये घडली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 13 वर्षांची सातवीमध्ये शिकत असताना पीडित मुलीला मासिक पाळीदरम्यान त्रास व्हायचा आणि पोटात दुखत असायचे. याचाच फायदा घेऊन नराधम बापाने आई घरात नसताना पीडित मुलीला तुझ्या पोटात दुखतंय का? मला यावर उपाय माहिती आहे, असे सांगून वडिलांनीच मुलीवर अत्याचार केला.
नंतर नराधम बापाने 2013 ते 19 मार्च 2020 या कालावधीत धमकी देऊन मुलीवर वेळोवेळी अतिप्रसंग केला. कुटुंबातील आई आणि पीडित मुलगी धुणीभांडी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु नराधम बाप काम न करता मुलीला आणि आईला मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी मंगळवारी पीडित मुलीने बारामती शहर पोलिसांना आपल्या पित्याविरोधात तक्रार दिली आहे.