सातारा – माण मतदारसंघात सर्वपक्षीय “आमचं ठरलयां’ मधून अनिल देसाई व रणजितसिंह देशमुख हे आज अर्ज भरणार असून यामवधून दिशाहीन होत सवतासुभा मांडत माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारीमुळे माण मतदारसंघात उलट- सुलट चर्चेला उधाण आले आहे.
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी माण मतदारसंघातील अचानक दाखल होणाऱ्या या “आमचं ठरलयां ‘मधील दाखल होणाऱ्या या दोन उमेदवारीने राजकीय पटलावर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर या सर्वपक्षीय आघाडीमधून कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार प्रभाकर देशमुख स्वतंत्र विचारसरणीने अपक्ष अर्ज दाखल करीत आहेत.
याच बरोबरीने शेखर गोरे यांचाही अर्ज दाखल होणार असून सोमवार दि. 7 रोजी अर्ज माघारी नंतरच माण विधानसभा मतदारसंघातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा येथील एका नामांकित हॉटेलवर गुरूवार, दि. 3 रोजीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या गुप्त बैठकीतील निर्णयाला कितीसा प्रतिसाद मिळतो. हा येणारा काळच प्रतिस्पर्धकाला आव्हान देणारा ठरेल का? याकडे खटाव- माणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.