पाकमध्ये इम्रान खान यांचे सरकार अडचणीत

* विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या तयारीत
* अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीस सरकार जबाबदार असल्याचा विरोधी पक्षाचा आरोप

लाहोर : आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आता देशातील विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कारण इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र आले असून सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची तयारी सुरू विरोधी पक्षाने सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

इम्रान खान यांचे सरकार इथला मुख्य दक्षिणपंथी पक्ष असणारा ‘अक्षम’ हा पक्ष सरकार पाडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर विरोधी पक्षाने देखील अक्षमला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे. देशातील उद्भवलेल्या आर्थिक संकटासाठी अक्षम पक्षाने सरकारला जबाबदार धरले आहे. त्यामुळे सरकारने देशातील परिस्थितीची जबाबदारी स्विकारावी आणि इमरान खान यांनी पंतप्रधानपदावरून दूर व्हावे अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीसाठी अक्षम पक्षासह विरोधी पक्ष स्वातंत्र्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे..

इम्रान खान देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप अक्षम पक्षाने केला आहे. स्थानिक अहवालानुसार जमीअत अलेमा-ए-इस्लाम-फजल (जेयूआय-एफ) प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांचा निर्णय मुख्य विरोधी पक्ष पीएमएल-एन आणि पीपीपीच्या निर्णयानंतर आला आहे. हे दोन्ही पक्ष पंतप्रधान खान यांना सत्तेतून काढून टाकण्याच्या ‘एकल संघर्ष’च्या विरोधात आहेत आणि सर्व पक्षांची परिषद बोलवून बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. जेयूआयएफचे प्रमुख म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी 25 जुलैची निवडणूक नाकारली होती आणि नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.