अहमदाबाद :– रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा जखमी झाला आहे. त्यामुळे अहमदाबादमधील गुजरातविरुद्धचा सामना त्याला मध्यंतरी सोडावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून कसोटी पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्ण हा दौरा संपल्यानंतर कर्नाटककडून रणजी सामने खेळत होता.
शुक्रवारी रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी प्रसिधने १४.५ षटके टाकली. क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले तेव्हा त्याने २ बळी घेतले होते. तो बरा होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल, असे मानले जात आहे. याच कारणामुळे शुक्रवारी रात्री उशिरा इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत त्याला स्थान मिळालेले नाही.
गुजरातच्या पहिल्या डावात २६४ धावा
पहिल्या डावात फलंदाजी करताना गुजरातने कर्नाटकविरुद्ध २६४ धावा केल्या आहेत. गुजरातकडून क्षितिज पटेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १६१ चेंडूंचा सामना करत ९५ धावा केल्या. तर उमंग कुमारने ७२ धावा केल्या. गुजरातचा कर्णधार चिंतन गजा याने ४५ धावा केल्या. कर्नाटककडून वासुकी कौशिकने ४९ धावा देत ४ बळी घेतले. तर विजय वैशाक, रोहित कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी २ गडी बाद केले.
महाराष्ट्र २५४ धावांनी पिछाडीवर
पुण्यातील एमसीए गहुंजे मैदानावर चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात महाराष्ट्राने दुसऱ्या दिवस अखेर १ बाद १४९ धावांपर्यंतच मजल मारली आहे. सध्या महाराष्ट्राचे पवन सिंग(६४) व नुशाद सिंग(६३) खेळत असून झारखंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या आधारे महाराष्ट्र अद्याप २५४ धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवशी झारखंडच्या विराट सिंगचे(१०८) दमदार शतक व शाहबाज नदीमच्या ४१ धावांच्या बळावर संघाने ४०३ धावा फलकावर चढवल्या. महाराष्ट्राकडून हितेश वळुंजने गोलंदाजीत ६-९१ अशी कमालीची गोलंदाजी केली. अक्षय पालकरनेही २ फलंदाज बाद केले.