Ranji Trophy 2024 Prize Money : मुंबईने रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव केला. मुंबईला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. मुशीर खान, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही चांगली कामगिरी केली.

𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 are WINNERS of the #RanjiTrophy 2023-24! 🙌

Mumbai Captain Ajinkya Rahane receives the coveted Trophy 🏆 from the hands of Mr Ashish Shelar, Honorary Treasurer, BCCI. 👏 👏#Final | #MUMvVID | @ShelarAshish | @ajinkyarahane88 | @MumbaiCricAssoc | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LPZTZW3IV4
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024

रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ चॅम्पियन बनला आहे. संघाला बक्षीस म्हणून बीसीआयकडून 5 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशननेही 5 कोटींचं बक्षीस जाहीर केलं. त्यामुळे रणजी करंडक विजेत्या मुंबईच्या संघाला 10 कोटीची रक्कम मिळणार आहेत. आजवर मुंबईने सर्वाधिक तब्बल42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे.
𝑹𝒆𝒊𝒈𝒏𝒊𝒏𝒈 𝑪.𝑯.𝑨.𝑴.𝑷.𝑰.𝑶.𝑵.𝑺 🏆
MCA proudly celebrates another #RanjiTrophy triumph 🎊#MCA #Mumbai #Wankhede #BCCI #Champions #RanjiTrophyFinal #Final pic.twitter.com/Lrm3Uyz0Kz
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 14, 2024
या स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या विदर्भाच्या संघाला 3 कोटी रूपये बक्षीसस्वरूपी मिळाले आहेत. यापूर्वी विदर्भानं दोन वेळ रणजी ट्राफी जिंकलेली आहे.
For his superb hundred in the #RanjiTrophy #Final, Musheer Khan is named the Player of the Match. 👍 👍
He receives the award from the hands of Mr Ashish Shelar, Honorary Treasurer, BCCI. 👏 👏#MUMvVID | @ShelarAshish | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/T3l6mLW6kP
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024
मुंबईसाठी मुशीर खानने चमकदार कामगिरी केली. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. मुशीरला 50 हजारांचे बक्षीस मिळाले आहे.
Tanush Kotian bagged the Player of the Tournament award for brilliant all-round display 🙌 🙌
He receives the award from Mr Ajinkya Naik, Honorary Secretary, Mumbai Cricket Association. 👏 👏#RanjiTrophy | #Final | #MUMvVID | @ajinkyasnaik | @MumbaiCricAssoc | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/eMbRcr4s24
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024
तनुष कोटियन ( Tanush Kotian) याला संपूर्ण स्पर्धेतील शानदार अष्टपैलू ( 502 धावा आणि 29 विकेट्स) कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरविण्यात आले. त्याला 2 लाख 50 हजाराचे बक्षीस मिळाले.
गेल्या वर्षी बक्षिसाच्या रक्कमेत वाढ…
दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्येच बीसीसीआयने डोमेस्टिक क्रिकेटमधील सर्व स्पर्धांची बक्षीस रक्कम ही वाढवली होती. यापूर्वी रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला 2 कोटी तर उपविजेत्यांना 1 कोटी रूपये मिळत होते.
Ranji Trophy 2024 Final : मुंबईचे विक्रमी 42वे विजेतेपद! विदर्भाची झुंज अपयशी…
आता यात बदल करण्यात आला असून बक्षीस रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. BCCIच्या नव्या बक्षीस रक्कमेनुसार यंदाच्या रणजी ट्रॉफी 2024 च्या विजेत्या संघाला 5 कोटी रूपये तर उपविजेत्या संघाला 3 कोटी रूपये मिळणार आहे.