BCCI announces India’s squad for 2 ENG Tests : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेलने टीम इंडियात प्रवेश केला आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्यात आले आहे. विकेटकीपर फलंदाज इशान किशनचाही टीम इंडियात समावेश नाही. युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला संधी मिळाली आहे.
मोहम्मद शमीला संघात मिळाले नाही स्थान…
भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज शमी संघाचा भाग नाही. 2023 च्या विश्वचषकात शमीने घातक गोलंदाजी केली होती. त्याला नुकतेच अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तरीही तो संघाबाहेर आहे.
बुमराह-सिराजचे पुनरागमन…
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. ते अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेचा भाग नाही. दोघांनाही ब्रेक देण्यात आला आहे. आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संघात स्थान निर्माण करण्यात यश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही टीम इंडियात समावेश आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान, इशानबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले होते की, तो स्वत: ब्रेकवर गेला आहे.
Team India : ….तर हार्दीक पंड्याला भारतीय संघात पुनरागमन करणे होणार कठीण
ध्रुव जुरेलची टीम इंडियात एन्ट्री…
ध्रुव जुरेलने टीम इंडियात प्रवेश केला आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. सुमारे 23 वर्षांचा ध्रुव शेष भारत आणि अंडर 19 इंडिया अ संघाकडूनही खेळला आहे. त्याचा देशांतर्गत रेकॉर्ड चांगला आहे. ध्रुवने 15 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये 790 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने 10 लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. ध्रुवने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कमाल दाखवली आहे.
An action-packed Test series coming 🆙
Check out #TeamIndia‘s squad for the first two Tests against England 👌👌#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vaP4JmVsGP
— BCCI (@BCCI) January 12, 2024
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ…
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन. अश्विन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.