मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील वाद कमी होण्याची कोणतीही चिन्ह नाही. दोन्ही नेते रोज एकमेकांवर खोचक शब्दांत टीका करताय. एकाने केलाला दावा दुसरा लगेच खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच, संजय राऊत यांनी ‘आपण नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कधीच भेटलो नाही’, असा दावा केला होता. त्यावर आता नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विट करत गौप्यस्फोट केलाय. सध्या त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील..’ असं नारायण राणे म्हणाले होते. यावेळी ते नाशिक मध्ये समाजमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, राणेंच्या या वक्तव्यावर ‘आताच माझे उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलणे झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे हसत होते. खरंतर राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधी त्यांना भेटलो नाही. मी कधी बेमान, गद्दांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. परंतु राणे यांना आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा झाली असेल’. असं संजय राऊत म्हणाले होते.
नारायण राणेंनी पक्ष सोडल्यापासून मी एकदाही त्यांना भेटलो नाही – संज्या राऊत
मग या फोटोमध्ये जो संज्या बसलाय तो तुझ्या बापाने दिल्लीमध्ये वेगळा जन्माला घातला होता काय. pic.twitter.com/NwCPOrlNwU
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 8, 2023
मात्र, आता संजय राऊत यांच्या या टीकेला नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विट करत जोरदार उत्तर दिल आहे. निलेश राणेंनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊत, नारायण राणे आणि सुप्रिया सुळे देखील दिसून येत आहे. निलेश राणे म्हणतात, “नारायण राणेंनी पक्ष सोडल्यापासून मी एकदाही त्यांना भेटलो नाही… संज्या राऊत मग या फोटोमध्ये जो संज्या बसलाय तो तुझ्या बापाने दिल्लीमध्ये वेगळा जन्माला घातला होता काय’. असं ट्विट त्यांनी केलं आहे. दरम्यान, निलेश राणे यांच्या या ट्विटला संजय राऊत नेमकं काय? उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.