अयोध्या – अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाला सुरूवात झाली असून कलश यात्रा राम मंदिरात पोहोचली आहे. आता रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम पुढील काही दिवस सुरू राहणार असून रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंबंधित वेगवेगळ्या विधींना सुरूवात करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी देशभरातील ऋषी-मुनींना आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये प्रभू रामलल्ला नव्याने बांधलेल्या मंदिरात प्रवेश करणार आहेत. रामजन्मभूमी संकुलाचा फेरफटका मारत रामलल्लाची मूर्ती मंदिरात नेण्यात येणार आहे.
त्यासाठी शरयू नदीच्या पाण्याने गर्भगृह शुद्ध करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत एटीएसची टीम झाली असून या टीमने शहरात कसून पाहणी केली. या सोहळ्यासाठी पंतप्रधानांसह अनेक मान्यवर येत असल्याने अयोध्येत एटीएसचे पेट्रोलिंग सुरू राहणार आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 5 वर्षांच्या रामललाच्या बालस्वरूपातील या मुर्तीत ते कमळाच्या फुलावर उभे असलेले दिसतील आणि त्यांच्या हातात धनुष्यबाणही असेल.