India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score : आज, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, 22 धावांवर चार विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी 130 हून अधिक धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला असून यादरम्यान,रोहित शर्माने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले.
🚨 Milestone Alert 🚨
Most T20I hundreds in Men’s cricket! 🔝 👏
Take. A. Bow Rohit Sharma 🙌 🙌
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/J0hALcdhuF
— BCCI (@BCCI) January 17, 2024
या फॉरमॅटमध्ये शतके झळकावण्याच्या बाबतीत तो पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला आहे. रोहितने अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले. त्याने 64 चेंडूत शतक झळकावले.
रोहित 14 महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करत आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते, पण आता त्याने धमाकेदार पुनरागमन केले आहे.