नवी दिल्ली – राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या काही दिवस अगोदर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अयोध्या ते बेंगळुरू आणि अयोध्या ते कोलकाता दरम्यानच्या पहिल्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटचे उद्घाटन केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोलकाता ते अयोध्या दरम्यानच्या पहिल्या विमानाचा बोर्डिंग पास मिळाला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, उत्तर प्रदेशचा विकास नवीन उंची गाठत आहे. जर आपण उत्तर प्रदेशची लोकसंख्या पाहिली तर, अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी जवळपास 70 टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. युरोपातील निम्मी लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये आम्ही दिवाळी साजरी केली.
आता आणखी एक दिवाळी २२ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन कार्यक्रमात सामील झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, नवीन विमानतळांसह राज्यात चार आंतरराष्ट्रीय विमानतळे आली आहेत.ते म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत, उत्तर प्रदेशमध्ये केवळ नवीन विमानतळच आले नाहीत तर ४ आंतरराष्ट्रीय विमानतळांसह, उत्तर प्रदेश हवाई कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे राज्य बनले आहे.
पंतप्रधान मोदींनी 30 डिसेंबर रोजी अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी शनिवारी, विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमित उड्डाणे सुरू होतील आणि विमानतळावरील उड्डाणांची संख्याही वाढेल.