पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल, ससी कुमार मुकुंद, रामकुमार रामनाथन या भारतीय खेळाडूंनी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत भारताच्या खेळाडूंसाठी आजचा दिवस संमिश्र ठरला. भारताच्या साकेत मायनेनी याला तुर्कीच्या एर्गी किर्रकीन यांच्याकडून 3-6,7-5,6-4 असा पराभव पत्करावा लागला. प्रज्ञेश गुणेश्वरनने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत चंद्रील सुदचा केवळ 49 मिनिटांत 6-1,6-3 अशा फरकाने सहज पराभव केला. भारताच्या सुमित नागलने 1 तास 16 मिनिटांच्या सामन्यात 6-3, 7-6 (5) असा टायब्रेकमध्ये पराभव केला.
भारताच्या रामकुमार रामनाथन याने ग्रीसच्या मार्कोस कालोवेलोनीसचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. ससी कुमार मुकुंदने जपानच्या तोशिहीदे मत्सुई याचा 6-2, 6-3 असा पराभव केला. दुहेरी गटात भारताच्या एन. विजय सुंदर प्रशांत व इंग्लंडचा ब्रेडन क्लेन या जोडीने भारताच्या धृव सुनिश व आर्यन गोवीस यांचा 6-2,6-1 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
एकेरी गट- दुसरी फेरी- प्रज्ञेश गुणेश्वरन वि वि चंद्रील सुद 6-1, 6-3. सुमित नागल वि वि आर्यन गोवीस 6-3, 7-6 (5). ससी कुमार मुकुंद वि.वि. तोशिहीदे मत्सुई 6-2, 6-3. रामकुमार रामनाथन वि.वि. मार्कोस कालोवेलोनीस 6-3, 6-4. केम ईलकेल वि वि. विनायक शर्मा काझा 6-2, 6-1. ब्रेडन क्लेन वि. वि. सिद्धार्थ रावत 6-1, 3-6, 6-4. एर्गी किर्रकीन वि. वि. साकेत मायनेनी 3-6, 7-5, 6-4. रोबेर्टो ओल्मेडो वि. वि. अनिरुद्ध चंद्रसेखर 6-3, 6-2. ब्रेडन क्लेन वि. वि. सिद्धार्थ रावत 6-1, 3-6, 6-4. ली डकही वि. वि. अझिझ डोगाझ 6-3, 6-4. स्टिव्ह डिझ वि.
वि. युसुके ताकाहाशी 6-2, 6-2. ईवान नेदेल्को वि. वि. धृव सुनिश 6-3, 5-7, 6-2. दुहेरी गट – पहिली फेरी
बोगदान बोब्रो व इवान नाइडल्को वि. वि. तिमुर खाबीबुलीन व मार्कोस कलोवेलोनिस 6-4, 6-7, 10-3. अझिझ डोगाझ व केल्विन हेमरी वि.वि. धृव मुळे व डेव्हिड सरेरो 6-2, 7-5. रोबेर्टो ओल्मेडो व स्टिव्ह डिझ वि.वि. केम ईलकेल व एर्गी किर्रकीन 6-2, 6-2. एन. विजय सुंदर प्रशांत व ब्रेडन क्लेन वि.वि. धृव सुनिश व आर्यन गोवीस 6-2, 6-1.