Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिरात दाखल झाले आहेत. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पोहोचले. त्यांनी क्रीम कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. रामललाला चांदीची छत्री घेऊन पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गर्भगृहात दाखल झाले आहेत. त्यांच्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे देखील उपस्थित आहेत. सध्या राम लालांच्या प्राणप्रतिष्ठाची पूजा सुरु झाली आहे. या पूजेसाठी गर्भगृहात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित आहेत.
अयोध्या धाम में श्री राम लला की प्राण-प्रतिष्ठा का अलौकिक क्षण हर किसी को भाव-विभोर करने वाला है। इस दिव्य कार्यक्रम का हिस्सा बनना मेरा परम सौभाग्य है। जय सियाराम! https://t.co/GAuJXuB63A
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, अयोध्या धाममध्ये श्री राम लालांच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांना भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. जय सिया राम.
याआधी ते गेल्या 11 दिवसांपासून कडक विधी पाळत आहे. ते महाकाव्य रामायणाशी संबंधित मंदिरांनाही भेट देत आहेत.