रकुल प्रीत सिंहच्या “सरदार का ग्रॅन्डसन’ सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे. याशिवाय आणखी एक सिनेमा तिने स्वीकारला आहे. त्यामध्ये तिने अगदी बोल्ड रोल स्वीकारला आहे. या सिनेमात ती चक्क कंडोम टेस्टरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
रॉनी स्क्रूवालाचे प्रॉडक्शन असलेल्या या सिनेमाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. रकुलने या सिनेमात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. पण अद्याप करार केलेला नाही. हा एका कॉमेडी सिनेमा असणार आहे. आयुष्मान खुराना जसे सिनेमे करत असतो, तसाच हा देखील एक ब्लॅक कॉमेडी असणार आहे.
भारतात लोक कंडोम खरेदी करायला लाजत असतात. त्याबाबत चर्चा देखील करत नाहीत. त्यादृष्टीने हा सिनेमा अगदी बोल्ड असेल आणि त्याला कॉमेडीचा तडका देखील असेल. रकुल प्रीत सिंगचा “सरदार का ग्रॅन्डसन’ 18 मे रोजी रिलीज होणार आहे.